ऑनलाइन विश्वात भरपूर ज्ञान उपलब्ध असले तरी ऑफलाईन विश्वातील ज्ञानही अफाट आहे. परंतु व्हर्च्युअल विश्व झपाट्याने वाढत असताना त्यात खोटेपणा, अज्ञान आणि दिशाभूल यांचा धोका कधी नव्हता इतका वाढला आहे. इथे कोणीही काहीही मांडू शकतो, लिहू शकतो. या सवलतीचा फायदा घेऊन अनेक खोट्या गोष्टी लोकांच्या माथी मारल्या जात आहेत. प्रचंड माहितीच्या गदारोळात खरे काय? खोटे काय? हे तपासणेही सर्वसामान्य लोकांसाठी अवघड होऊन बसले आहे. संशोधक, सत्यशोधक यांचा आवाज क्षीण झाला आहे. अशावेळी ज्यांना सत्य माहित आहे, त्यांनी गप्प धोक्याचे असते.
आजूबाजूला सत्यनिष्ठ माणसे अजूनही आहेत. ती आपापल्या परीने सत्य उघड करण्याचा प्रयत्न करीत आहेत. आपल्या पूर्वजांनीही काही अनमोल सत्ये शोधून आपल्यासमोर मांडून ठेवलेली आहेत. त्या सर्व गोष्टींना व्हर्चुअल विश्वात स्थान मिळवून देण्याचा एक प्रयत्न म्हणून ही वेबसाईट सुरू करत आहोत. प्रामुख्याने ऑफलाईन जगातील ज्ञान काही नवीन माहिती आणि संदर्भ समाविष्ट करून ऑनलाईन आणण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे. आपणास हा प्रयत्न कसा वाटतो ते आम्हाला जरूर सांगा.
संपर्क- ashoksalunkhe1958@gmail.com