जगातले पहिले वर्तमानपत्र कोणी प्रसिद्ध केले ?

SHARE:

    सुरुवातीची वर्तमानपत्रे आजच्या वर्तमानपत्रांसारखी मुळीच नव्हती. ती बातमी असलेल्या पत्रांप्रमाणे होती. इ.स. पूर्व पाचव्या शतकात, रोममध्ये...



    सुरुवातीची वर्तमानपत्रे आजच्या वर्तमानपत्रांसारखी मुळीच नव्हती. ती बातमी असलेल्या पत्रांप्रमाणे होती. इ.स. पूर्व पाचव्या शतकात, रोममध्ये असे लोक होते की, ते ही बातमीचा मजकूर असलेली पत्रे हातांनी लिहीत आणि राजधानीच्या शहरापासून दूर राहत असलेल्या लोकांना ती पाठवीत.

    इ.स. पूर्व ६० मध्ये आपल्या बातमीपत्राप्रमाणे काही अशी पाने ज्युलिअस सीझरने प्रस्थापिली. त्याच्या सरकारतर्फे जाहीर वादविवादस्थानी पोहोचविण्यासाठी दररोज पत्रिका प्रकाशित होत असत. मुख्यत्वे सरकारच्या जाहीरनाम्यासाठी वाहून घेतलेल्या ह्या पत्रिकेला Acta Diurna' (अॅक्टा) डियुर्ना), म्हणत. ज्याचा अर्थ 'नेहमी घडत असलेल्या गोष्टी' असा होतो.

    नंतरच्या काळात लवकर आणि वेळेत बातम्या मिळवणे, ही मुख्य गरज झाली आहे आणि ती व्यापाराच्या हेतूने व्यापाऱ्यांना किंवा उद्योजकांना कोणत्या महत्त्वाच्या गोष्टी घडल्या हे त्यांना कळणे आवश्यक होते. म्हणून प्रथम एक वर्तमानपत्र अथवा बातमीपत्रिका सोळाव्या शतकात आंतरराष्ट्रीय बँकर्स असलेले जर्मन कुटुंब फुगर्स (Fuggers) ह्यांनी सुरू केले. त्यांनी बातम्या- ज्या विश्वसनीय असू शकतील त्या- गोळा करण्याची प्रत्यक्ष पद्धतच अमलात आणली.

    त्याच सुमारास, व्हेनिसमध्ये, सरकारकडून प्रतिदिनी बाहेर पडलेल्या सूचना एक gazeta (गॅझेटा) फी देऊन लोक वाचीत असत. ह्यांना Notizie Scritte (लिहिलेल्या बातम्या) असे म्हणत.

    लंडनमध्ये, पहिले नियमित प्रसिद्ध झालेले बातमीपत्र म्हणजे १६६३ मधील Intelligencer (इन्टलिजन्सर). पूर्वीची खूपशी वर्तमानपत्रे आठवड्यातून एकदाच प्रसिद्ध होत. कारण दळणवळण आणि उत्पादन ह्या दोन्हीही गोष्टी अतिशय हळू होत होत्या.

    इ. स. १६९० मध्ये बोस्टन येथे, पहिले अमेरिकन वर्तमानपत्र 'Publick Occurrences' (पब्लिक ऑकरन्सीस्) नावाने प्रसिद्ध झाले, परंतु वसाहतीच्या गव्हर्नरने ते लगेच थांबविले. इ. स. १७२९ ते १७६५ पर्यंत बेन्जामिन फ्रँकलिनने Pennsylvania Gazette (पेनसिल्व्हानिया गॅझेट) चे व्यवस्थापन केले. लोकांमध्ये इतकी उत्सुकता होती की, अमेरिकन क्रांतीच्या सुमारास ३७ वर्तमानपत्रे वसाहतींमध्ये (Colnies) प्रकाशित झाली.

    कधीही बंद न झालेले असे अतिवजनदार बातमीपत्र म्हणजे 'लंडन टाइम्स', जे १७८५ पासून दर दिवसाचे जागतिक रजिस्टर म्हणून प्रसिद्ध करण्यात येत आहे.



COMMENTS

Name

Fact check,1,अध्यात्मिक पंथ,1,आश्चर्यकारक,1,इतिहास,7,उद्योग,2,गणित,1,चरित्र,4,तंत्रज्ञान,4,भोंदुगिरी,1,विज्ञान,4,व्यवसाय,4,सामाजिक,1,साहित्य,1,
ltr
item
सही रे सही: जगातले पहिले वर्तमानपत्र कोणी प्रसिद्ध केले ?
जगातले पहिले वर्तमानपत्र कोणी प्रसिद्ध केले ?
https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEjNGk9qJDAu0YF5UpXkE25446xgJprTlnekWsdQk0QHZkC5QeBx_zaOtnWYg0Z0RzbG2hgdL8TRZBBVtK-a6Mems-HMVoXW-erntiLDeUOhfg1JHHNa-Sz5IR61wMGd1IupYotKhdKVp_JOsAt0kS2aEs3NSgL6xi_bdarSNQsuRmxfUkGOk3_iOKlsbOg/s1600/download%20(7).png
https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEjNGk9qJDAu0YF5UpXkE25446xgJprTlnekWsdQk0QHZkC5QeBx_zaOtnWYg0Z0RzbG2hgdL8TRZBBVtK-a6Mems-HMVoXW-erntiLDeUOhfg1JHHNa-Sz5IR61wMGd1IupYotKhdKVp_JOsAt0kS2aEs3NSgL6xi_bdarSNQsuRmxfUkGOk3_iOKlsbOg/s72-c/download%20(7).png
सही रे सही
https://www.sahiresahi.com/2023/07/HistoryOfNewspaper.html
https://www.sahiresahi.com/
https://www.sahiresahi.com/
https://www.sahiresahi.com/2023/07/HistoryOfNewspaper.html
true
3306975734372947672
UTF-8
Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content