'पारले'च्या बिस्किट पुड्यावरची ती मुलगी कोण?

SHARE:

             आपल्या जन्मापासून सध्याच्या वेळेपर्यंत काही ब्रँड्स आपल्या हृदयात घर करून बसलेले असतात. त्या ब्रँडशी आपला काहीही संबंध नसताना त...

    


   
    आपल्या जन्मापासून सध्याच्या वेळेपर्यंत काही ब्रँड्स आपल्या हृदयात घर करून बसलेले असतात. त्या ब्रँडशी आपला काहीही संबंध नसताना त्यांबद्दल आपणास आपुलकी वाटत असते. असाच एक ब्रँड आहे 'पारले'. आबालवृद्धांच्या हृदयात घर केलेला हा ब्रँड आहे. पारले कंपनीने अनेक उत्पादने बनवली. पण पारले कंपनीशी लहानपणी आपली पहिली ओळख होते ती 'पारले-जी' या बिस्किटामुळेच. आणि या बिस्किटाचे नाव काढले की डोळ्यांसमोर येतो एक निरागस, गुटगुटीत, हसऱ्या, लोभसवण्या आणि उल्हासपूर्ण डोळ्यांच्या मुलीचा चेहरा. हा चेहरा 'पारले-जी' ची ओळखच बनला आहे जणू! कुणाचा आहे हा चेहरा? कोण आहे ती मुलगी? आणि सध्या तिचे वय काय आहे? सध्या ती काय करते? असे अनेक प्रश्न अनेकांच्या मनात कधी ना कधी येऊन गेलेले असणारच आहेत.

    गेल्या काही दिवसांपासून याबाबतच काही पोस्ट वारंवार व्हायरल होताना दिसत आहेत. त्यामध्ये या मुलीबाबाबत माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामध्ये कधी ही मुलगी म्हणजे इन्फोसिस फाऊंडेशनच्या सुधा मूर्ती आहेत असे सांगितले जाते तर कधी त्या निरू देशपांडे असल्याचे सांगितले जाते. त्या मुलीचे नाव गुंजन गंडानिया असल्याचेही सांगितले जाते. अशा अनेक दाव्यांमुळे संभ्रमात वाढच झाली.
मग पारले-जी ची पर्मनंट मॉडेल असणारी ती मुलगी कोण? त्याबाबतची माहिती पारले कंपनीने अधिकृतपणे जाहीर केली आहे की ती मुलगी म्हणजे निव्वळ एक कल्पनाचित्र आहे. एव्हरेस्ट या जाहिरात कंपनीच्या स्केच आणि कमर्शियल आर्टिस्टने स्वप्रतिभेने निर्मिलेले हे कल्पनाचित्र आहे. कोणत्याही जीवित अथवा मृत व्यक्तीशी या चित्राचा कसलाही संबंध नाही.
    विसाव्या शतकाच्या अखेरीस 'पारले'ने आपल्या बिस्किटांचे बाह्यवरण पूर्णपणे बदलूनच टाकायचे ठरवले. त्यांनी बिस्किटे जास्त काळ ताजी आणि कुरकुरीत राहावी यासाठी बिस्किटांच्या पुड्यांचे जुन्या पद्धतीचे वॅक्स पेपरचे पॅकेजिंग काढून टाकून त्याऐवजी नवे अत्याधुनिक BOPP (Biaxially oriented polypropylene) चे पॅकेजिंग करायला सुरुवात केली. आणि मग एकविसाव्या शतकाच्या सुरुवातीपासून चकचकीत आणि टवटवीत वाटणाऱ्या गडद लाल रंगातल्या अधिक आकर्षक अशा नव्या पॅकिंगमध्ये 'पारले'ची बिस्किटे मिळू लागली. 'पारले'ने ग्लुकोजच्या बिस्किटांचे पॅकिंग बदलले. पण त्यावरचे चित्र मात्र बदलले नाही. त्यावरची ती काल्पनिक मॉडेल गर्ल कायमच राहिली. अजूनही मॉडेल गर्ल तीच आहे.


COMMENTS

Name

Fact check,1,अध्यात्मिक पंथ,1,आश्चर्यकारक,1,इतिहास,7,उद्योग,2,गणित,1,चरित्र,4,तंत्रज्ञान,4,भोंदुगिरी,1,विज्ञान,4,व्यवसाय,4,सामाजिक,1,साहित्य,1,
ltr
item
सही रे सही: 'पारले'च्या बिस्किट पुड्यावरची ती मुलगी कोण?
'पारले'च्या बिस्किट पुड्यावरची ती मुलगी कोण?
https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEhNvC1fp_aETSSjOmM_TfM3E7-YcvgT9ZMt_Vua33Pa7CNBRUYKGzFAci0glg8MxDB1-CjVlZUQazczgy3xPG_zUBYRA9QmiCtp_31KFQrwxogzL6fEwo9xHR3nU3CEQgeWqevUhJTzmMcGPLQx1eoxu32rPlJ0ZPkcrDT_IRkVYMNFWeYU6WHGZMmo/s320/303764701_f9ee73af4a_c.jpg
https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEhNvC1fp_aETSSjOmM_TfM3E7-YcvgT9ZMt_Vua33Pa7CNBRUYKGzFAci0glg8MxDB1-CjVlZUQazczgy3xPG_zUBYRA9QmiCtp_31KFQrwxogzL6fEwo9xHR3nU3CEQgeWqevUhJTzmMcGPLQx1eoxu32rPlJ0ZPkcrDT_IRkVYMNFWeYU6WHGZMmo/s72-c/303764701_f9ee73af4a_c.jpg
सही रे सही
https://www.sahiresahi.com/2023/03/whoisparlegirl.html
https://www.sahiresahi.com/
https://www.sahiresahi.com/
https://www.sahiresahi.com/2023/03/whoisparlegirl.html
true
3306975734372947672
UTF-8
Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content